Gold Price Today: ग्राहकांना धक्का ! सराफा बाजारात तेजी ; 10 ग्रॅम सोन्याचा भाव वाढला , जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today: ग्राहकांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. पुन्हा एकदा भारतीय सराफ बाजारात सोन्याचे भाव वाढले आहे. आज सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 323 रुपयांनी वाढून 53,039 रुपयांवर पोहोचला आहे. हा भाव मागच्या ट्रेडिंग सत्रात 52,716 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिली आहे.

चांदीच्या दरात वाढ झाली

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 639 रुपयांनी वाढून 62,590 रुपये किलो झाला. त्याच वेळी, स्पॉट मार्केटमध्ये मजबूत मागणीमुळे व्यापाऱ्यांनी त्यांच्या सौद्यांचा आकार वाढविला, ज्यामुळे वायदा व्यवहारात चांदीची किंमत 445 रुपयांनी वाढून 62,075 रुपये प्रति किलो झाली.

सोन्या-चांदीचे भाव का वाढत आहेत?

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे कमोडिटी रिसर्च विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवनीत दमानी यांच्या मते, फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या तपशीलावरून असे दिसून येते की मध्यवर्ती बँकेची भूमिका अपेक्षेपेक्षा खूपच कमी आक्रमक आहे. या संकेतानंतर, प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलरची घसरण झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या किमती दिवसाच्या नीचांकीवरून वधारल्या.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीची किंमत कशी होती?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,755.75 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव 21.55 डॉलर प्रति औंस होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक दिलीप परमार यांच्या मते, यूएस फेडरल रिझर्व्हच्या ताज्या बैठकीचा तपशील व्याजदर वाढीचा वेग कमी करण्यास अनुकूल आहे.

यानंतर कॉमेक्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या तपशिलानंतर सोन्याच्या किमतीत परत आले असून ते $१,८०० प्रति औंसच्या दिशेने वाटचाल करत आहे.

हे पण वाचा :- Urfi Javed : अर्रर्र .. उर्फी जावेदला धक्का ! आता कधीच जाऊ शकणार नाही दुबईला ; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe