Gold Price Today : जर तुम्ही सोने (Gold) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी (Golden opportunity) आहे. कारण मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर घसरत आहे.
या आठवड्यात सोने 1214 रुपयांनी स्वस्त (Cheap) झाले आहे. सोन्याच्या दरात सलग पाचवी घसरण (Gold decline) झालेली आहे.

आज सोने किती स्वस्त आहे
Goodreturn (Goodreturn) वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दिल्लीच्या (Delhi) सराफा बाजारात (Market) पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,800 रुपये प्रति दहा ग्रॅमवर घसरला आहे.
काल म्हणजेच शुक्रवारी सोन्याचा भाव 47 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. आजच्या किमतीची कालच्या किमतीशी तुलना केली तर आज 22 कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम 100 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर
शनिवारी 22 कॅरेट सोन्याबरोबरच 24 कॅरेट सोन्याच्या (24 carat gold) दरातही घसरण झाली आहे. शनिवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,150 रुपयांवर आला. याआधी शुक्रवारी सोन्याचा भाव 52,250 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. म्हणजेच कालच्या तुलनेत आज सोने 100 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
सलग पाचव्या वर्षी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे
या आठवड्यात सोन्याच्या किमतीत झालेली ही सलग पाचवी घसरण आहे. Goodreturn वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार या आठवड्यात मंगळवारपासून सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे.
मंगळवार ते शनिवार या कालावधीतील सोन्याच्या किमतीतील घसरण एकत्र केली तर आज सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम एकूण 1214 रुपयांची घसरण झाली आहे.