Gold Price Today: भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) आज म्हणजेच गुरुवारी सोन्याचे दर (Gold price) जाहीर झाले आहेत. गेल्या आठवड्यात आणि या आठवड्यातही सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे.
गुरुवारीही सोन्याचा भाव त्याच्या विक्रमी उच्चांकी किमतीच्या 9 हजार रुपयांनी खाली आले आहे. म्हणजेच या दृष्टिकोनातूनही सणांच्या आधी सोने खरेदी करण्याची आजची सुवर्णसंधी आहे.सध्या बाजारात सोने खरेदीसाठी मोठी गर्दी पहिला मिळत आहे.

24 कॅरेट सोन्याचा दर
24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. गुरुवारी दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमतही वाढली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 650 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर आज सोन्याचा भाव 50,620 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला आहे. मागील व्यवहारात सोन्याचा भाव 49,970 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता.
आज 22 कॅरेट सोन्याचा भाव किती आहे
गेल्या काही व्यवहारातील घसरणीचा फटका बसल्यानंतर आज, गुरुवारी सोन्याच्या भावात मोठी उसळी पाहायला मिळाली. गुरुवारी सोन्याचे भाव सावरताना दिसत आहेत. Goodreturn वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत 600 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,400 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला आहे. मागील व्यवहारात सोन्याचा भाव 45,800 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव 55,400 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता. आज बाजारात सोन्याचा दर 49313 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. जर तुम्ही आजच्या किमतीची त्याच्या सर्वकालीन उच्च दराशी तुलना केली तर तुम्हाला दिसेल की सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 9000 रुपयांपर्यंत तुटला आहे.