Gold Price Today : जर तुम्ही सोने खरेदी (Gold Buy) करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण सोन्याच्या दरात कमालीची घसरण (Gold prices fall) झाली आहे.
गेल्या आठवडाभरापासून सोन्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने (Gold) खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे.

सोने किती स्वस्त आहे
गुड रिटर्न वेबसाइटवरून (Good Return Website) मिळालेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी, 23 ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात 600 रुपयांची लक्षणीय घसरण झाली आहे.
यासह 22 कॅरेट सोन्याचा (22 carat gold) भाव 47,000 रुपयांच्या पातळीवर घसरला. मागील व्यवहारात सोने 47,600 रुपयांच्या पातळीवर बंद झाले होते.
24 कॅरेट सोन्याचा दर
मंगळवारी 22 कॅरेटसोबतच 24 कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 700 रुपयांनी घसरला.
यासह 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,230 रुपये प्रति दहा ग्रॅमवर घसरला. मागील व्यवहारात सोन्याचा भाव 52,930 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता.
सोन्याच्या भावात सलग सातवी घसरण
गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या किमतीत घसरण सुरूच आहे. Goodreturn वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या किमतीत (Gold price) घसरण होत आहे.
गेल्या मंगळवार ते या आठवड्यातील मंगळवारपर्यंत सोन्याच्या किमतीत झालेली घसरण एकत्र केली तर आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 2014 रुपयांनी घसरला आहे.