Gold Price Update : लग्नसराई चा सीजन सुरु आहे. लग्न सोहळा म्हंटल की सोन्या (Gold) चांदीचे (Silver) दागिने आलेच. लग्नसराईच्या सिजनमुळे सोन्या चांदीच्या मागणीतही वाढ झाली आहे.
काही आठवड्यपासून सोन्या चांदीच्या दरात बदल होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ (Increase) होताना दिसत आहे.
आज सोने 264 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आहे, तर चांदी प्रति किलो 623 रुपयांनी वाढताना दिसत आहे. सध्या सोन्या-चांदीचा भाव 51400 आणि 62700 रुपयांच्या जवळ आहे. यासोबतच सोने आजवरच्या उच्चांकावरून 4731 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 17200 रुपये किलो दराने स्वस्त होत आहे.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या व्यापार आठवड्याच्या पाचव्या दिवशी (3 जून) शुक्रवारी सोने 264 रुपये प्रति दहा ग्रॅमने महागले आणि 51469 रुपये प्रति दहा ग्रॅमवर उघडले.
तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 599 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या दराने महाग होऊन तो 51205 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला, तर आज चांदी प्रति किलो 623 रुपयांनी महाग होऊन 62699 रुपयांवर उघडली.
तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 1265 रुपयांच्या वाढीसह 62076 रुपये प्रति किलोवर बंद झाली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन प्रमाणेच मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर देखील आज सोन्यासोबतच चांदीचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहे.
आज एमसीएक्सवर सोने 75 रुपयांनी महाग होत असून तो 51344 रुपयांच्या पातळीवर आहे. तर चांदी 380 रुपयांच्या वाढीसह 62716 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
सोने 4700 आणि चांदी 17200 स्वस्त होत आहे
असे असूनही, सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4700 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.
त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 17281 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे. अशा परिस्थितीत, जे सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी ही खरेदीची चांगली संधी ठरू शकते.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
अशाप्रकारे, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५१४६९ रुपये, २३ कॅरेट सोन्याचा भाव ५१२६३ रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७१४६ रुपये प्रति १० ग्रॅम, १८ कॅरेट सोन्याचा भाव ३८६०२ रुपये प्रति १० ग्रॅम आणि सोन्याचे १४ कॅरेट 30109 प्रति 10 ग्रॅम पातळी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीची स्थिती
भारतीय सराफा बाजाराच्या (Indian bullion market) विपरीत, आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यासह चांदीचा व्यवहार मंदावला आहे. अमेरिकेत सोन्याचा व्यापार $2.21 ने घसरून $1867.70 प्रति औंस झाला. दुसरीकडे, चांदी $0.03 च्या घसरणीसह $22.35 प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे.