अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे दर कमी होत आहे. तर आज पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
एका अहवालानुसार सोन्याचे दर 457 रुपयांनी कमी होऊन 46,390 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर 347 रुपयांनी कमी होऊन 67,894 रुपये प्रति किलो झाले आहेत.
आधीच्या सत्रामध्ये मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर चांदीची किंमत 68,241 रुपये प्रति किलो होती. तर सोन्याचे दर 661 रुपयांनी कमी होऊन 46,847 रुपये प्रति तोळा होते.
सोन्याचे दर काय ? दिल्ली सराफा बाजारात 22 कॅरेट सोने 46,390 रुपये प्रतिदहा ग्रॅम आहे. तर मुंबईत 46,430 रुपये आहे. याशिवाय चेन्नईत 10 ग्रॅमचे 22 कॅरेट सोन्याचा दर 44,650 होता.
तर आता 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,710 रुपयांवर होता. चांदीचा भाव काय ? शनिवारी चांदीच्या दरात कपात झाली आहे. आता यामध्ये 347 रुपयांनी कपात होऊन चांदी 67,894 रुपये प्रतिकिलोवर आली आहे.
जाणकारांच्या मते अमेरिकन इक्विटी मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आणि बिटकॉइनच्या दरात तेजी आल्यामुळे सोन्या चांदीमध्ये कमजोरी पाहायला मिळते आहे.
दरम्यान ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 च्या स्तरावर पोहोचले होते, त्यामुळे या सर्वोच्च स्तरावरुन सोन्याचे दर 9000 रुपयांनी कमी झाले आहेत.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved