अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- गेल्यावर्षी सार्वकालिक उच्चांकाला गवसणी घालणाऱ्या सोन्याचा दरात सध्या घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसांत तिसऱ्यांदा सोन्याची किंमतीत घट नोंदवण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळच्या सत्रात मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर (MCX) ऑक्टोबर वायद्याच्या सोन्याचा भाव 0.1 टक्क्यांनी म्हणजे साधारण 48 रुपयांनी घसरला.
तर डिसेंबर वायदाच्या चांदीचा दर 0.24 टक्के म्हणजे साधारण 149 रुपयांनी घसरला. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात दरांमध्ये फरक आहे.
भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव
ग्रॅम 22 कॅरेट (भाव रुपयांत)
1ग्रॅम 4,614
8 ग्रॅम 36,912
10 ग्रॅम 46,140
100 ग्रॅम 4,61,400
भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव –
ग्रॅम 24 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 5,034
8 ग्रॅम 40,272
10 ग्रॅम 50,340
100 ग्रॅम 5,03,400
प्रमुख शहरातील सोन्याचे भाव –
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई 46,000 47,000
पुणे 45,220 48,410
नाशिक 45,220 48,410
अहमदनगर 4,5180 47,440
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम