Gold Silver Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने सोने आणि चांदीच्या दरात घसरण किंवा वाढ होत असते. तसेच सणासुदीच्या काळात किंवा लग्नसराईच्या हंगामात सोने आणि चांदीचे दर बदलत असतात.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असून सोन्याच्या किमती वाढल्या आहेत तर चांदी पुन्हा घसरली आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी करणाऱ्यांना काहीसा फटका बसला आहे. नवीन किमती जाणून घ्या.
होऊ शकते आणखी घसरण
देशात खरमास सुरू झाली असून या काळात सनातन धर्मातील विवाह संपतात. त्यामुळे मार्केटमध्ये सोने आणि चांदीची मागणी कमी होते. मागणीअभावी येत्या काळात दागिन्यांमध्ये आणखी घसरण होऊ शकते.
आजचे सोने आणि चांदीचे दर
24 कॅरेट सोन्याचा आजचे दर 260 रुपयांनी वाढला असून वाढीनंतर सोन्याचा दर 54,640 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 250 रुपये प्रति 10 ग्रॅमने खाली आला असून तो 50,100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. चांदीमध्ये आज घसरण झाली असून ही घसरण 500 रुपयांची झाली आहे. घसरणीनंतर 999 शुद्ध चांदीची किंमत 69,000 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
प्रमुख शहरांमध्ये किंमत, प्रति दहा ग्रॅम
- चेन्नई : रु 50560 (22कॅरेट) रु 55160 (24कॅरेट)
- मुंबई : 49950 (22कॅरेट), 54490 (24कॅरेट)
- दिल्ली : 50140 (22कॅरेट), 54670 (24कॅरेट)
- कोलकाता : 50100 (22कॅरेट), 54490 (24कॅरेट)
- जयपूर : 50100 (22कॅरेट), 54640 (24कॅरेट)
- लखनौ : 50100 (22कॅरेट), 54640 (24कॅरेट)
- पाटणा : 50000 (22कॅरेट), 54540 (24कॅरेट)
- भुवनेश्वर : 49950 (22कॅरेट), 54490 (24कॅरेट)
चांदीचा आजचा दर
आज चांदीचा दर 69000 रुपये प्रति किलो झाला आहे. तर मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनौ इत्यादी शहरांमध्ये 69000 प्रति किलो तसेच चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू इत्यादी शहरांमध्ये किंमत 73000 रुपये आहे.
या गोष्टी लक्षात ठेवा
- सोन्या-चांदीच्या वर दिलेल्या किमती सूचक असून त्यावर जीएसटी किंवा अन्य कोणताही कर जोडला नाही. त्याशिवाय अचूक किंमतीसाठी तुमच्या स्थानिक सराफा किंवा ज्वेलरशी संपर्क साधावा.
- सोन्याच्या दागिन्यांमध्ये ज्वेलर्स किंवा उत्पादक वेगळा शुल्क आकारत असतात. खरेदी करताना याची माहिती असणे खूप गरजेचे आहे. मेकिंग चार्ज ज्वेलर ते ज्वेलर्स बदलतो.
- सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग असणे बंधनकारक असून खरेदी करताना त्याची खात्री करा.
शुक्रवारी हा होता दर
HDFC सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी सोन्याचा भाव 107 रुपयांनी वाढून 54,222 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. तर चांदीच्या दरातही घसरण झाली होती. आज 120 रुपयांनी घट झाली आहे. यानंतर चांदी 68,001 रुपये प्रति किलोवर आहे.