अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-आंतरराष्ट्रीय बाजारात पिवळ्या धातूच्या दरातील घसरण आणि डॉलरच्या मजबुतीमुळे स्थानिक बाजारात सोन्यावर दबाव निर्माण झालाय.
बुधवारी (दि. 24) सोन्याच्या किंमतीमध्ये ८००० रुपये प्रति १०० ग्रॅमची घसरण झाली आहे. अर्थात भारतात सोन्याचे दर ८०० रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. या घसरणीनंतर २२ कॅरेट सोन्याचे दर रुपये प्रति तोळा ४३,००० रुपये आहेत.
तर २४ कॅरेट सोन्याचे दर ४४,००० रुपये प्रति तोळा आहेत. चांदीमध्ये सोन्याच्या दरासारखीच घसरण नोंदवली गेलीय. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीचा भाव 1866 रुपयांनी घसरून ६४,६०७ रुपयांवर आला.
मागील व्यापार सत्रात चांदीची किंमत, ६५,४७३ रुपयांवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव प्रति औंस २५.१२ डॉलरवर होता.
देशातील काही प्रमुख शहरातील सोन्याचे दर :- पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा दर ४३००० रुपये झाला आहे तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४४००० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४०४० रुपये झाला आहे.
२४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४८०४० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४३९० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६९९० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४२२९० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४६१३० रुपये आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|