Amazon Sale : स्मार्टफोनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण एका सेल दरम्यान तुम्ही तुमचा स्वप्नातला स्मार्टफोन विकत घेऊ शकता. दिग्ग्ज आणि लोकप्रिय स्मार्टफोनचा यात समावेश आहे.
यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. या सेलचे नाव ‘Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल’ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सेलचा तुम्ही ठराविक काळापर्यंत लाभ घेऊ शकता.

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 19 जानेवारी 2023 पासून सुरू होऊन ती 22 जानेवारी 2023 पर्यंत चालू राहणार आहे. तसेच ज्यांनी Amazon Prime चे सदस्यत्व घेतले आहे फक्त त्यांच्यासाठी हा सेल 18 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे.
या दरम्यान ग्राहकांना, मानक सवलती आणि बँक ऑफर व्यतिरिक्त, ग्राहकांना एक्सचेंज सवलत मिळणार आहे. त्यामुळे त्यांची खूप मोठी बचत होईल.
स्वस्तात खरेदी करता येणार स्मार्टफोन
या सेल दरम्यान, ग्राहकांना Oppo, Xiaomi, OnePlus, Samsung, Apple आणि Vivo सारख्या ब्रँडचे स्मार्टफोन्स स्वस्तात घेता येतील. अॅमेझॉनने सांगितले आहे की त्यांच्या ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स, अॅक्सेसरीज आणि गॅझेट्सवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाईल आणि स्मार्टफोन, अॅक्सेसरीज आणि स्मार्टवॉच ते लॅपटॉपवर एकूण 40% पर्यंत सूट दिली जाणार आहे.
बँक कार्डचा लाभ मिळणार
जर तुम्ही SBI क्रेडिट कार्डने पैसे जमा केले तर तुम्हाला 10% झटपट सूट असणार आहे. SBI क्रेडिट कार्डसह EMI व्यवहारांवरही अशीच सवलत ग्राहकांना मिळणार आहे. या सेल दरम्यान, ग्राहकांना नवीन लॉन्च, बजेट मार्केट, ब्लॉकबस्टर डील आणि प्री-बुकिंग सारखे पर्याय दररोज रात्री 8 वाजता मिळणार आहेत.