FD Interest Rates 2023 : तुमच्यापैकी अनेकांचे बँकेत खाते असेलच. काही बँका आपल्या ग्राहकांना बँकेत ठेवलेल्या रकमेवर चांगले व्याज देतात तर काही बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याज देतात. काहीजण बँकेत एफडी सुरु करतात. प्रत्येक बँकेच्या एफडीवर व्याज वेगवगेळे असते.
अशातच आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण दोन बँका एफडीवर सर्वात जास्त व्याज देत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही पैसे कमावण्याची चांगली संधी आहे. कोणत्या बँका ज्येष्ठ नागरिकांना ज्यास्त व्याज देत आहेत पाहुयात सविस्तर.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या व्याजदरात वाढ
8 मार्च 2023 पासून उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून त्यांच्या FD व्याजदरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. पुनरावृत्तीनंतर, बँक 13 महिन्यांत आणि 1 दिवस ते 559 दिवसांच्या कालावधीत 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींसाठी 8 टक्के व्याजदर ऑफर करत आहे. तर या बँकेच्या म्हणण्यानुसार, बँक 80 आठवड्यांत (560 दिवस) 2 कोटी रुपयांच्या आत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 8.25 टक्के व्याजदर देत आहे. अशातच बँक आता सर्व कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50 टक्के जास्त व्याजदर देईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया
सर्वोत्कृष्ट योजनेअंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना एक वर्षाच्या ठेवींवर 7.6 टक्के व्याजदर मिळू शकतो, तर इतरांना 7.1 टक्के व्याजदर मिळू शकतो. SBI 400 दिवसांच्या विशेष अमृत कलश ठेवी अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के आणि इतरांना 7.1 टक्के व्याज देण्यात येत आहे.