खुशखबर! अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा प्रदर्शित झालेला ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

करोनामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवल्यामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाने कमाईच्या बाबतील अनेक रेकॉर्ड केले आहेत. आता हा चित्रपट ७ जानेवारी रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे.

एकीकडे हा सिनेमा रेकॉर्ड ब्रेक कमाई करत असताना दुसरीकडे वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. देशात अनेक ठिकाणी करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी निर्बंध लागू केले जात आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe