खरेदीदारांसाठी खुशखबर ! सोन्याचे दर गडगडले… जाणून घ्या काय आहे दर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच योग्य संधी आहे. कारण सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळते आहे.

राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 54 रुपयांच्या घसरणीसह प्रति 10 ग्रॅम 46,448 रुपयांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे चांदीचे भाव 178 रुपयांनी गडगडले.

राजधानी दिल्लीत चांदीला प्रति किलो 59,217 रुपयांचा भाव मिळाला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात घसरण दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम सोने-चांदीच्या भावावरदिसून आला आहे.

दरम्यान मल्टि कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचे प्रति 10 ग्रॅम 47,548 भावाने ट्रेडिंग सुरू होते. चांदीच्या भावाने प्रति किलो 59, 217 रुपयांचा टप्पा गाठला आहे.

मागील सहा दिवसांतील मुंबईतील सोन्याचे भाव :-

•11 जानेवारी :48,590/प्रति तोळे

• 10 जानेवारी :48,610/प्रति तोळे

• 09 जानेवारी :48,610 /प्रति तोळे

• 08 जानेवारी :48,600/प्रति तोळे

• 07 जानेवारी :48,510 /प्रति तोळे

बाजारपेठेवर ओमिक्रॉनचे सावट असले तरीही लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या भावात तेजी-घसरणीचे चित्र कायम राहण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe