7th Pay Commission : केंद्र सरकार (Central Govt) सणासुदीच्या काळात (Festival season) केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) वाढवून आणखी एक भेट देऊ शकते. लवकरच केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर (Fitment factor) वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते.
असे झाल्यास त्यांच्या पगारात वाढ होईल. हे कर्मचारी (Central employees) अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढवून देण्याची मागणी करत होते. लवकरच त्यांची ही मागणी मंजूर केली जाईल.
फिटमेंट फॅक्टर वाढवता येईल
महागाई भत्त्यात वाढ करण्यासोबतच केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्येही वाढ करू शकते. फिटमेंट फॅक्टर वाढवल्यानंतर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन वाढेल.
सरकारी कर्मचारी फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. सध्या तो 2.57 टक्क्यांच्या पातळीवर आहे, तो वाढवून 3.68 टक्के करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात वाढ केल्यास किमान मूळ वेतन 18 हजारांवरून 26 हजार रुपये होईल.
दिवाळीत फिटमेंट फॅक्टर वाढू शकतो
मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांनुसार, दिवाळी (Diwali) किंवा दसऱ्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सर्व कर्मचार्यांचे मूळ वेतन फिटमेंट फॅक्टरद्वारे ठरवले जाते.
नवरात्रीमध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढू शकतो
डीए वाढवण्याची मागणी केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून बऱ्याच दिवसांपासून होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नवरात्रीला सरकार डीएमध्ये 4 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा करू शकते.
या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ निश्चित मानली जाते. 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी मिळू शकते. यानंतर, वाढीव महागाई भत्ता जुलै 2022 पासून लागू होईल.
याशिवाय, ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजेच AICPI च्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की , केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केवळ या वर्षीच नव्हे तर पुढील वर्षीच्या जानेवारीतही वाढ होणार आहे.