क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर ! भारत – पाकिस्तान मध्ये होणार क्रिकेटचा सामना

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- आयसीसीने 2021 या वर्षातील टी20 विश्वचषकाच्या सामन्यांसाठीच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचे 24 ऑक्टोबरपासून सामने सुरु होणार आहेत.

संघाचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध होईल. T20 वर्ल्डकप 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे विरोधी संघ एकाच गटात म्हणजेच Team A मध्ये आहेत.

टी20 विश्वचषकादरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये 24 ऑक्टोबर रोजी दुबई येथे सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळं हा ब्लॉकबस्टर सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी आतापासूनच बेत आखण्यास सुरुवात केली आहे.

भारताच्या सामन्याचे वेळापत्रक

24 ऑक्टोबर – भारत वि.पाकिस्तान

31 ऑक्टोबर- भारत वि. न्यूझिलंड

3 नोव्हेंबर- भारत वि. अफगाणिस्तान

5 नोव्हेंबर- भारत वि. क्वॉलिफायर ग्रुप बी विजेता टीम

8 नोव्हेंबर- भारत वि. क्वालिफायर ग्रुप ए रनर अप टीम

या T20 वर्ल्ड कपमधील पहिला उपांत्य सामना हा 10 नोव्हेंबरला खेळवला जाणार असून दुसरा उपांत्य सामना हा 11 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना हा 14 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe