PM Kisan 13th Installment : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आज खात्यात जमा होणार 2 हजार रुपये

Ahilyanagarlive24 office
Published:

PM Kisan 13th Installment : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी PM किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्याचे पैसे जमा केले होते. अशातच आता शेतकरी या योजनेच्या 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

कारण केंद्र सरकारकडून आज खात्यात 2 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. शेतकऱ्यांची आतुरता आज संपणार आहे. परंतु, यातील काही शेतकऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे. शेतकऱ्यांनी जर अजूनही eKYC केली नसेल तर त्यांना या हप्त्याचे पैसे खात्यात जमा होणार नाहीत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पंतप्रधान तेथील हायटेक रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करून ते किसान सन्मानचा PM किसान सन्मान निधीचा नवीन हप्ता जारी करणार आहेत.

यापूर्वी 17 ऑक्टोबर 2022 रोजी नरेंद्र मोदी यांनी 12 व्या हप्त्याअंतर्गत 16,000 कोटी रुपये जारी केले होते. त्यानंतर ही रक्कम 8 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली.

आज जारी केला जाणार हप्ता

तुम्हाला आता तुमच्या हप्त्याची स्थिती स्वतः तपासता येईल. यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर पीएम किसान http://www.pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावे लागणार आहे. इथे गेल्यावर तुमच्यासमोर फार्मर्स कॉर्नर येईल. त्यावर क्लिक करून तेथे Beneficial Status चा पर्याय निवडा. तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकून Get Data वर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या हप्त्याची स्थिती समजेल. जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही टोल फ्री हेल्पलाइनचाही आधार घेऊ शकता.

असा करा मंत्रालयाशी संपर्क

  • पीएम किसान टोल फ्री क्रमांक- 18001155266
  • पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक- 155261
  • पीएम किसान लँडलाइन नंबर- 011-23381092, 23382401
  • पीएम किसानची नवीन हेल्पलाइन- 011-24300606
  • पीएम किसान आणखी एक हेल्पलाइन- 0120-6025109
  • ई-मेल आयडी- [email protected]

बंधनकारक आहे eKYC

या पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, सर्व शेतकऱ्यांना असे सूचित करण्यात आले आहे की आता 13वा हप्ता मिळवायचा असेल तर ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर ते त्वरित करून घ्या. यानंतर तुमच्या खात्यात पैसे येतील.

eKYC करूनही पैसे आले नाही तर करा हे काम

या योजनेअंतर्गत तुमची स्थिती आणि लाभार्थ्यांची यादी तपासली पाहिजे. लाभार्थी यादी तपासत असताना तुमचे नाव दिसत नसल्यास तुमच्या अर्जात काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे. हे दुरुस्त करण्यासाठी, तुम्ही पोर्टलवर तसेच जवळच्या कृषी सहाय्य केंद्रावर ऑफलाइन जाऊ शकता.

अशी पहा स्थिती

  • सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जावे लागेल.
  • आता होम पेजवर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर हा पर्याय निवडावा लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागणार आहे.
  • आता ड्रॉप डाउन वर क्लिक करा.
  • त्यात तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
  • यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागणार आहे.
  • जर तुमचे लाभार्थ्यांच्या यादीत नाव नसेल तर अर्जात काही त्रुटी राहण्याची शक्यता आहे.
  • ते तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी सहाय्य केंद्राला भेट देऊन ऑफलाइन किंवा पोर्टलच्या मदतीने त्रुटी दूर करू शकता.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe