Gold Price Update : देशात नुकतीच लग्नसराई सुरु झाली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या मागणीत हळूहळू वाढ देखील होत आहे. तसेच गेल्या काही दिवस सोने आणि चांदीच्या किमती खूपच वाढल्या होत्या मात्र आता सोने 3200 रुपयांपेक्षा स्वस्त झाले आहे.
देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पण आता सोन्याच्या किमती उतरल्याने तुम्ही देखील सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करू शकता. सध्या सोने आणि चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे.
सध्या सोने 56000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 62000 रुपये प्रति किलो या किमतीमध्ये विकली जात आहे. गेल्या आठवडाभरात सोन्या-चांदीचे भाव घसरत राहिले. गेल्या व्यापार आठवड्यात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 434 रुपयांनी तर चांदीचा भाव 2348 रुपयांनी घसरला.
सोने 3200 रुपयांनी तर चांदी 18000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे
गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याची किंमत उच्चांकापर्यंत पोहोचली होती मात्र सध्या त्यामध्ये घसरण झाली आहे. सध्या सोने त्यांच्या उच्चांक किमतीपासून 3200 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. 2 फेब्रुवारी 2022 सोन्याने उच्चांक गाठला होता. यावेळी सोन्याची किंमत 58882 रुपये होती.
चांदी अजूनही त्याच्या उच्चांक किमतीपासून 18189 रुपये प्रति किलो स्वस्त मिळत आहे. चांदीची आतापर्यंत उच्चांक किंमत 79980 रुपये होती. सध्या लग्नसराई सुरु झाली आहे त्यामुळे लवकरच सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ होऊन दरही वाढू शकतात.
नवीनतम 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर
शुक्रवारी सोन्याच्या दरात किरकोळ वाढ पाहायला मिळाली. तसेच शनिवारी आणि रविवारी सोन्या चांदीचे दर जाहीर होत नाहीत. 24 कॅरेट सोने 383 रुपयांनी महागून 55669 रुपये झाले, 23 कॅरेट सोने 381 रुपयांनी महागून 55446 रुपये झाले,
22 कॅरेट सोने 356 रुपयांनी महाग होऊन 50993 रुपये झाले, 18 कॅरेट सोने 287 रुपयांनी वाढून 41752 रुपये झाले आणि 14 कॅरेट सोने 287 रुपयांनी महाग होऊन 32566 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.