Indian Railway : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता तिकीटासोबत ‘ही’ गोष्ट मिळत आहे मोफत, तुम्हाला माहिती आहे का?

Indian Railway : आपल्यापैकी अनेकांनी आयुष्यात एकदातरी रेल्वेने प्रवास केला असणारच. तुम्ही आता काही तासांच्या प्रवासापासून ते एक ते दोन दिवसांचा प्रवास तुम्ही रेल्वेने करु शकता. रेल्वे ही खूप कमी खर्चीक असून ती आपल्याला आपल्या ठिकाणापर्यंत अगदी वेळेत पोहोचवते.

त्यामुळे अनेकजण जे लांबच्या प्रवासासाठी रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी सतत नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत असते. परंतु, अनेकांना रेल्वेच्या या सुविधांबद्दल माहिती नसल्यामुळे त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही.

मोफत दिली जाते ही सुविधा

जेव्हा जेव्हा आपण रेल्वे प्रवासासाठी रेल्वेचे तिकीट काढतो आणि तेव्हा रेल्वेच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रवाशांना एक विशेष सुविधा देण्यात येते. रेल्वे स्थानकावर उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या सुविधेचा लाभ घेता येतो. रेल्वेकडून आपल्या सर्व प्रवाशांना मोफत वायफायची सुविधा देण्यात येतो.

विनाशुल्क वापरता येतो वायफाय

भारतीय रेल्वेच्या माध्यमातून हजारो रेल्वे स्थानकांवर वायफाय बसवले आहे. हे लक्षात ठेवा की हे वायफाय त्या स्थानकावर उपस्थित असणारे सर्व लोक वापरू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वायफायसाठी रेल्वे प्रवाशांकडून कोणतेही शुल्क घेण्यात येत नाही. वायफाय वापरून लोक त्यांच्या फोनवर इंटरनेट चालवू शकतात.

सर्व स्थानकांवर मोफत मिळत आहे वायफाय

प्रवासी आणि स्थानकावर उपस्थित असणाऱ्या लोकांना हा वायफाय विनामूल्य वापरता येतो. भारतातील सर्व रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे सतत प्रयत्न करत आहे. देशातील निम्म्यापेक्षा जास्त रेल्वे स्थानकांवर रेल्वेकडून मोफत वायफायची सुविधा देण्यात येत असली तरी अजून सध्या मोफत वायफाय सुविधेपासून अजूनही वंचित असणाऱ्या रेल्वे स्थानकांवर लवकरच वायफाय सुविधा उपलब्ध होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe