Railway News : राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळी आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातून विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय. उत्तर महाराष्ट्रातून लवकरच रेल्वेकडून विशेष गाडी चालवली जाणार आहे.
अतिरिक्त गर्दी पाहता जळगाव–भुसावळ मार्गे दोन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उधना–भागलपूर–उधना आणि मालदा–उधना–मालदा या दोन अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.

सणासुदीच्या काळात राज्यातून बिहार, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या असल्याने या गाड्यांचा हजारो नागरिकांना फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष गाड्यांचे वेळापत्रक कसे राहणार याची माहिती जाणून घेऊयात.
उधना–भागलपूर विशेष गाडी
उधना–भागलपूर अनारक्षित विशेष रेल्वे 27 ऑक्टोबरपर्यंत चालवली जाणार आहे. ही गाडी सकाळी सव्वा अकरा वाजता उधना येथून सोडली जाणार आहे. दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी जळगाव स्थानकात येणार आहे. त्यानंतर मग ती भागलपूरकडे सोडली जाणार आहे. त्यानंतर मग भागलपूर–उधना विशेष गाडी 28 ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी 10:50 वाजता भागलपूरहून सोडली जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता उधना येथे पोहोचणार आहे.
मालदा–उधना विशेष गाडी
मालदा–उधना विशेष गाडी मालदा येथून दुपारी 12:20 वाजता सोडली जाणार आहे व दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6:55 वाजता भुसावळात थांबा घेणार आहे. ही गाडी 25 ऑक्टोबर तसेच 1 आणि 8 नोव्हेंबर रोजी सोडली जाणार आहे. तसेच परतीची उधना–मालदा विशेष गाडी सोमवारी उधना येथून दुपारी 12:20 वाजता सोडली जाणार आहे व दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6:55 वाजता भुसावळात थांबा घेणार आहे.
ही गाडी 21 आणि 28 ऑक्टोबर तसेच 4 व 11 नोव्हेंबर रोजी धावणार आहे. रेल्वेच्या या विशेष गाड्यांमुळे सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांना गर्दीपासून आराम मिळणार अशी आशा आहे. जळगाव आणि भुसावळ परिसरातील नागरिकांसाठी हा निर्णय नक्कीच सोयीचा आणि दिलासादायक राहणार आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आगाऊ तिकिट बुकिंग करून प्रवास नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.