News : पुण्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. दिवाळी आणि इतर सणासुदीच्या काळात वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून नेहमीच विशेष गाड्या चालवल्या जातात. यावर्षी सुद्धा विभागाकडून हडपसर–नांदेडदरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
या गाडीमुळे दिवाळीत गावी जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मराठवाडा आणि पुणे विभागातील प्रवाशांना याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष गाडीचे संपूर्ण वेळापत्रक कसे आहे? याचा आढावा घेऊयात.
काय आहेत डिटेल्स?

मध्य रेल्वेकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यानुसार नांदेड–हडपसर विशेष रेल्वे उद्या तसेच २८ ऑक्टोबरला सकाळी ८.३० वाजता नांदेडहून सोडली जाणार आहे. तसेच ती त्याच दिवशी रात्री ९.४० वाजता हडपसरला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी हडपसर–नांदेड विशेष रेल्वे सुद्धा त्याच दिवशी रात्री १०.५० वाजता हडपसरहून सोडली जाणार आहे. ती दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१५ वाजता नांदेडला पोहोचणार आहे.
कोण कोणत्या स्टेशनवर थांबा घेणार?
पूर्णा जंक्शन
परभणी
गंगाखेड
परळी वैजनाथ
लातूर रोड
लातूर
धाराशिव
बार्सी टाउन
कुर्डुवाडी
दौंड
विशेष गाडीची संरचना कशी राहणार? गाडीत २२ एलएचबी डब्ब्यांचा समावेश आहे.
एक फर्स्ट एसी
दोन एसी २-टायर
सहा एसी ३-टायर
एक पॅन्ट्री कार
सहा स्लीपर क्लास
चार जनरल सेकंड क्लास
दोन जनरेटर व्हॅन
बुकिंग केव्हा सुरु झाले?
हडपसर ते नांदेड या गाडीचे बुकिंग २० ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता सुरु झाले. सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर बुकिंग सुरू झाले आहे. याच्या जनरल सेकंड क्लास डबे अनारक्षित कोच म्हणून चालवले जातील आणि यूटीएस प्रणालीद्वारे त्यांचे आरक्षण करता येईल. दरम्यान रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळेत आरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.