Highest Benefit for Senior Citizen : अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा देत असतात. यापैकी अशीच एक सुविधा देणारी बँक म्हणजे कॅनरा बँक होय. या बँकेतर्फे नागरिकांसाठी एक जीवनधारा बचत खाते उघडले जाते.
या खात्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खूप फायदे होतात. दोन लाखांचा नफा खातेधारकांना मिळतो. त्याशिवाय अनेक सुविधा खातेधारकांना बँकेकडून मोफत दिल्या जातात.
पात्रता
ज्यांचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे असे भारतातील रहिवासी या खात्यासाठी पात्र ठरतात. विशेष म्हणजे हे खाते शून्य शिल्लक ठेवून उघडता येते. ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला एकूण 20,000 रुपये किंवा महिन्याला सुमारे 1,700 रुपये शिल्लक राखणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नागरिकांना खात्यात जमा केलेल्या रकमेवर वार्षिक 2.9 टक्के इतके व्याज मिळते.
मर्यादा
या खातेधारकांना बँकेकडून मोफत डेबिट कार्ड देण्यात येते.या कार्डवर बँक कोणतेही शुल्क आकारणार नाही. त्याशिवाय दिवसाला एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा 25,000 रुपये इतकी आहे.
नागरिकांना कॅनरा बँकेच्या सर्व एटीएममध्ये बँक कितीही एटीएम मोफत व्यवहार करता येतात. पास बुक सुविधेव्यतिरिक्त, बँक महिन्याला खात्याची माहिती विनामूल्य प्रदान करते.
या सुविधाही मोफत मिळतात
खातेधारकांना काही सुविधा मोफत मिळतात. यामध्ये एसएमएस अलर्ट, आंतरबँक मोबाइल पेमेंट, नेट बँकिंग आणि दरमहा दोन NEFT/RTGS रेमिटन्स यांचा समावेश आहे. जोपर्यंत चेकबुक सुविधेचा संबंध आहे, खातेधारकांना वर्षाला 60 पर्यंत चेक पाने मोफत मिळतात.
मिळतो दोन लाखांचा नफा
पेन्शन खातेधारकांसाठी कर्जाची सुविधा मिळते. ‘कॅनरा पेन्शन उत्पादनांतर्गत, मासिक पेन्शनच्या 10 पट पर्यंत जास्तीत जास्त 2 लाख कर्ज दिले जाऊ शकते.’ असे बँकेने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे.
खातेधारकांना संपूर्ण गोपनीयता प्रदान करताना बँक नाममात्र शुल्कासाठी लिखित इच्छापत्र आणि कार्यकारी सेवेसाठी सहाय्य प्रदान करते. जर खातेधारकाने बँकेत पेन्शन खाते ठेवले तर ज्येष्ठ नागरिकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा वैयक्तिक अपघात विमा मिळतो.
त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर ही सुवर्णसंधी हातातून जाऊ देऊ नका. आजच कॅनरा बँकेत सर्व नियम आणि अटी जाणून घेऊन जीवनधारा बचत खाते चालू करा.