अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- फिरायला जायचे म्हंटले कि सगळ्यात आधी आठवते ते म्हणजे गोवा…. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे या ठिकाणी अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले होते.
यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला होता. मात्र आता पर्यटकांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. गोवा सरकारने कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, नाइट क्लब्सवरील निर्बंध शिथिल केले आहेत.

५0 टक्के उपस्थितीने कॅसिनो तसेच पर्यटन व्यवसायाशी संबंधित उपरोल्लिखित आस्थापने आजपासून खुली होतील. जलसफरी करणाऱ्या बोटी, वॉटर पार्क निम्म्या उपस्थितीने खुले करण्यास परवानगी दिली आहे.
महसूल खात्याचे सचिव संजय कुमार यांनी हा आदेश काढला. दरम्यान मार्चमध्ये कोविडची दुसरी लाट आल्यापासून गेले सहा महिने कॅसिनो, मसाज पार्लर, स्पा, बंदच होते.
दरम्यान, काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना (विद्यार्थी तसेच कर्मचारी वगळता) आरटीपीसीआर निगेटिव्ह दाखला सक्तीचा असून ५ दिवस घरी विलगीकरणात राहणेही सक्तीचे आहे.
या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार…
कॅसिनो तसेच स्पा, मसाज पार्लरांवर कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश मिळणार.
तसेच प्रवेश करण्याच्या ७२ तास आधी कोविड निगेटिव्हचा आरटीपीसीआर दाखला घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल.
दुसरा डोस किमान १५ दिवस आधी घेतलेला असावा.
मास्क परिधान करणे, सॅनिटायझिंग, थर्मल स्क्रीनिंग तसेच कोविडची इतर मार्गदर्शक तत्त्वें पाळणे सक्तीचे आहे.
आॅडिटोरियम, कम्युनिटी हॉल, सिनेमागृहांमध्ये ५0 टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने बसविता येणार नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम