खुशखबर ! ‘ह्या’ बँकेत खाते असेल तर तुम्ही डेबिट कार्डवरही घेऊ शकता ईएमआय, जाणून घ्या त्याविषयी सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- तुमचे स्टेट बँकेत खाते असल्यास, तुम्ही त्याच्या डेबिट कार्डवर EMI चा सहज लाभ घेऊ शकता. भारतीय स्टेट बँक (SBI) च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने डेबिट कार्डवर ईएमआयची सुविधा सुरू केली आहे.

देशभरातील एसबीआय ग्राहक त्यांच्या डेबिट कार्डद्वारे खरेदी करू शकतात आणि ईएमआयद्वारे पेमेंट करू शकतात. एसबीआय डेबिट कार्डद्वारे, 1,500 हून अधिक शहरांमधील 40,000 पेक्षा जास्त दुकाने आणि स्टोअरमध्ये खरेदी करता येते. ग्राहकाला हे पैसे सहा ते 18 महिन्यांत परत करावे लागतील.

खरेदीच्या वेळी त्याला ईएमआय कालावधी निवडावा लागतो. डेबिट कार्डने खरेदी केल्यानंतर ईएमआयमध्ये रूपांतरित करण्याची सुविधा ऑनलाईन शॉपिंगवरही मिळू शकते.

जर ग्राहकाने अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स साइटवरून एसबीआय डेबिट कार्डद्वारे खरेदी केली तर तो खरेदीची रक्कम सहज ईएमआयमध्ये बदलू शकतो. एसबीआय डेबिट कार्डने खरेदी केल्यावर ग्राहकाला 8000 ते 1 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. सध्या हा दर 14.70 टक्के दराने लागू अहे.

एसबीआयने या योजनेबद्दल म्हटले आहे, “असे सर्व ग्राहक ज्यांचे आर्थिक आणि क्रेडिट हिस्टरी चांगले आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.”

अशा ग्राहकांना बँकेकडून या योजनेची माहिती देण्यासाठी एसएमएस आणि ईमेल सातत्याने पाठवले जात आहेत. ग्राहकांना हवे असल्यास, ते स्वतः त्यांची पात्रता देखील तपासू शकतात. यासाठी त्यांना बँकेत नोंदणी केलेल्या त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून DCEMI टाइप करून 567676 वर एसएमएस पाठवावा लागेल.

 डेबिट कार्डवर ईएमआय कसा घ्यावा

– एसबीआय डेबिट कार्ड कोणत्याही मर्चंट स्टोअरमध्ये पीओएस मशीनद्वारे स्वाइप करावे लागते

– आता ब्रँड EMI आणि बँक EMI निवडा

– रक्कम आणि परतफेड कालावधी निवडा

– एकदा पीओएस मशीन कार्डची पडताळणी केल्यानंतर, पिन नंबर प्रविष्ट करा आणि ओके दाबा

– व्यवहार पूर्ण होताच कर्जाची रक्कम बुक केली जाईल

– पीओएस मशिनमधून एक पावती तयार केली जाईल ज्यावर मुदत आणि स्थितीची माहिती दिली जाईल. ग्राहकाला या पावतीवर सही करावी लागते

 ऑनलाइन शॉपिंगवर ईएमआय कसा घ्यावा

– बँकेत नोंदणीकृत मोबाईल नंबरच्या मदतीने अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या साईटवर लॉग इन करा

– तुम्हाला हवा असलेला ब्रँड निवडा आणि पेमेंटवर जा

– आता Easy EMI चा पर्याय निवडा. यासाठी तुम्हाला तेथे अनेक प्रकारचे पर्याय दिसतील. त्यात SBI ची निवड करावी लागेल

– येथे रक्कम स्वयंचलितपणे दिसेल कारण ती ऑटो फेच्ड असते. आता ईएमआयचा अवधी प्रविष्ट करा आणि प्रोसीड बटण दाबा

– तुम्हाला SBIचे लॉगिन पेज दिसेल. येथे इंटरनेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड माहिती प्रविष्ट करा

– कर्ज बुक केले जाईल आणि तुम्हाला अटी-शर्ती दिसेल. तुम्ही ते स्वीकारा आणि तुमचा EMI बुक होईल

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe