7th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेशनधारकांना केंद्र सरकार एक आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. कारण त्यांना आता होळीच्या अगोदर सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे. होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार आहे.
एकदम त्यांना सरकारकडून मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. रिपोर्टनुसार सरकार कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ, फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ आणि थकीत डीए मिळण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर त्यांच्या पगारात मोठी वाढ होईल.
होळीपूर्वी मिळणार गिफ्ट
कामगार मंत्रालयाने जाहीर केलेले डिसेंबर 2022 चे AICPI आकडे नोव्हेंबरच्या तुलनेत घसरले असून या आकडेवारीत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत सतत वाढ झाली होती. परंतु, डिसेंबरमध्ये एआयसीपीआयच्या आकडेवारीत काही प्रमाणात घसरण झाली आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरचा आकडा 132.3 अंकांवर घसरला आहे.
हाच आकडा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये 132.5 अंकांवर होता तर सप्टेंबरमध्ये 131.3, ऑगस्टमध्ये 130.2 आणि जुलैमध्ये 129.9 होता. त्यामुळे आता महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
होणार मोठा निर्णय
रिपोर्ट्सनुसार, 1 मार्च 2023 रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. जर असे झाले तर ३१ मार्चपासून कर्मचाऱ्यांना वाढीव पगार आणि पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मिळेल. इतकेच नाही तर थकबाकीसोबतच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
वाढत्या महागाईच्या आलेखावरून असे दिसत आहे की या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्क्यांनी वाढ केली जाऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा दर 6 महिन्यांनी आढावा घेण्यात येतो. हा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. एक जानेवारी महिन्यात आणि दुसरी जुलै महिन्यात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे.
जानेवारी 2023 साठी महागाई भत्ता हा शक्यतो होळीपूर्वी जाहीर करण्यात येतो. जर महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा खर्च सध्याच्या 38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांवर येईल.आता केंद्रीय कर्मचारी नवीन वर्षात महागाई भत्त्यात वाढ होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सरकार घेणार मोठा निर्णय
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या डीए थकबाकीचा प्रश्न अजून प्रलंबित असून या वर्षी सरकार त्यावर तोडगा काढेल अशी अपेक्षा आहे. कोरोनाच्या काळात जानेवारी 2020 ते जून 2021 या शेवटच्या 18 महिन्यांचा DA अजून दिला नाही.
कर्मचारी संघटनां याबाबत मागण्या करत आहेत. या मागण्या पाहता सरकार याबाबत मध्यममार्ग अवलंबून एकरकमी रक्कम जाहीर करण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर कर्मचाऱ्यांच्या खात्यात 2.18 लाख रुपये येतील.
होणार फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ
कर्मचारी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करावी अशी मागणी सतत करत आहेत.त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सरकार फिटमेंट फॅक्टरमध्ये रिव्हिजन वाढवण्याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. जर फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के दराने फिटमेंट फॅक्टर देत असून आता त्यात 3.68 पट वाढ करण्यात यावी अशी मागणी होत आहे. फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 पर्यंत वाढला तर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 वरून 26,000 रुपये होईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्यात आली होती. तर त्याच वर्षी सातवा वेतन आयोग लागू केला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे किमान पगार थेट 6000 रुपयांवरून 18000 रुपयांवर गेले होते. तर कमाल मर्यादा 90,000 रुपयांवरून 2.5 लाख रुपये केली होती. आता सरकार या वर्षी पुन्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची दाट शक्यता आहे.