Maharashtra Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय मोठी आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कृषी विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागात काही रिक्त पदांसाठी नुकतीच अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार कृषी विभागातील कृषी सेवकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत.
कृषी सेवक पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण कृषी सेवक पदासाठी काढण्यात आलेल्या या पदभरती बाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या अन किती पदांसाठी होणार भरती
कृषी विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार, कृषी विभागातील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांसाठी कृषी सेवक ही पदे भरली जाणार आहेत. या अंतर्गत वेगवेगळ्या विभागातील तब्बल 952 कृषी सेवकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता ?
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, कृषी सेवक पदासाठी कृषी विषयातील पदविका किंवा पदवी ग्रहण केलेला उमेदवार पात्र राहणार आहे.
किती वेतन मिळणार ?
कृषी सेवकांना आधी मात्र सहा हजार रुपये एवढं वेतन दिल जात होतं. या महागाईच्या काळात केवळ 6000 रुपयात कृषी सेवकांना आपले घर चालवावे लागत असे. यामुळे कृषी सेवकांच्या माध्यमातून वेतनात वाढ केली पाहिजे अशी मागणी केली जात होती. यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता.
दरम्यान या पाठपुराव्याला आता यश आले असून कृषी सेवकांचे दहा हजार रुपये एवढे वेतन वाढवण्यात आले आहे. कृषी सेवकांना आता सोळा हजार रुपये एवढे वेतन मिळणार आहे. यामुळे या पद भरती मध्ये जे उमेदवार कृषी सेवक म्हणून नियुक्त होतील त्यांना 16000 रुपये एवढे वेतन मिळणार आहे.
अर्ज कसा करायचा?
मिळालेल्या माहितीनुसार, या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. कृषी सेवक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक
कृषी सेवक पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून यासाठी 31 ऑगस्ट 2023 ही शेवटची दिनांक आहे. विहित कालावधीमध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज सादर करायचा असून विहित कालावधी उलटल्यानंतर या पदासाठी अर्ज सादर करता येणार नाही याची नोंद उमेदवाराने घ्यायची आहे.