Cheap Smart TV : जर तुम्हीही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता 55 इंचाचा सॅमसंग आणि एलजीचा स्मार्ट टीव्ही खूप स्वस्तात खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल.
जर तुम्हालाही हे टीव्ही विकत घ्यायचे असतील तर तुम्हाला फ्लिपकार्टला भेट द्यावी लागणार आहे. डिस्काउंटसह बँक ऑफर अंतर्गत कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर मिळत आहे. त्यामुळे स्मार्ट टीव्ही आणखी कमी किमतीत खरेदी करता येत आहे.

1. LG UQ8020 139 सेमी (55 इंच) अल्ट्रा HD (4K) एलईडी स्मार्ट टीव्ही
LG च्या या स्मार्ट टीव्हीची किंमत 84,990 रुपये इतकी आहे. तो 36% डिस्काउंटसह सेलमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर या टीव्हीची किंमत 53,990 रुपये इतकी झाली आहे. इतकेच नाही तर कंपनी या टीव्हीवर 11,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे.
फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या टीव्हीमध्ये 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह 55-इंचाचा 4K डिस्प्ले दिला आहे. तर शक्तिशाली आवाजासाठी, कंपनी 20 वॅट्सचा साउंड आउटपुट देत आहे. TV मध्ये तुम्हाला Netflix, Prime Video, Disney + Hotstar आणि YouTube सारखे इनबिल्ट अॅप्स मिळत आहे.
2. सॅमसंग द फ्रेम 138 सेमी (55 इंच) QLED अल्ट्रा HD (4K) स्मार्ट टिझेन टीव्ही (QA55LS03BAKLXL)
सॅमसंगच्या टीव्हीची किंमत फ्लिपकार्टवर 1,44,900 रुपये इतकी आहे. तसेच या सेलमध्ये 39 % सूट देण्यात येत आहे. डिस्काउंटनंतर तुम्ही हा टीव्ही 87,990 रुपयांना खरेदी करता येत आहे. जर तुमच्याकडे Flipkart Axis Bank कार्ड असेल तर, तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल.
त्याशिवाय या एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या सॅमसंग टीव्हीची किंमत 16,000 रुपयांपर्यंत कमी करता येत आहे. यासोबतच कंपनी या टीव्हीवर 5,000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस दिला जात आहे.
तसेच या टीव्हीमध्ये 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह उत्कृष्ट 4K डिस्प्ले मिळत असून तो 100Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या टीव्हीमध्ये शक्तिशाली आवाजासाठी 100-वॅट ऑडिओ सेटअप दिला आहे. हा टीव्ही Tizen ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. टीव्हीमध्ये तुम्हाला Netflix, Prime Video, Disney + Hotstar सारखे इनबिल्ट अॅप्स मिळत आहेत.