अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- जिल्हा परिषदेत सरळसेवेने भरती झालेल्या उपाध्यापकांना दिवाळीत मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात येण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद प्राथमिक विभागाने सुरू केली आहे.
सेवाज्येष्ठतेनूसार पदोन्नतीसाठी पात्र असणार्या उपाध्यापकांची यादी प्रसिध्द करण्यात आली असून त्या यादीवर सध्या हरकती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हरकती घेण्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर सेवाज्येष्ठता यादी अंतिम करून ती पुन्हा प्रसिध्द करण्यात येणार आहे. यात साधारण आठ ते दहा दिवसांचा कालावधी जाणार असून त्यानंतर संबंधीत यादी ही पदोन्नती समितीकडे जाणार आहे.
त्या ठिकाणी पदोन्नतीसाठी पात्र असणार्यांची नावे अंतिम करण्यात येणार आहेत. यामुळे पात्र असणार्या उपाध्यपकांना मुख्याध्यापक,
विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती मिळणार आहे. ही प्रक्रिया दिवाळीच्या आत किंवा दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम