Vivo V27 : खुशखबर ! सॅमसंग-शाओमीला टक्कर देणारा स्मार्टफोन विवो लाँच करणार

Ahmednagarlive24 office
Published:

Vivo V27 : दिग्ग्ज टेक कंपनी विवो सतत आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन घेऊन येत असते, अशातच पुन्हा एकदा कंपनी आपली शानदार सीरिज लाँच करणार आहे. कंपनी भारतीय बाजारात लवकरच Vivo V27 ही सीरिज लाँच करणार आहे.

या सीरिजमध्ये कंपनी 3 स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीची आगामी सीरिज लाँच झाल्यानंतर ती सॅमसंग-शाओमीसारख्या दिग्ग्ज टेक कंपन्यांना टक्कर देऊ शकते. दरम्यान या सीरिजमध्ये कंपनी कोणते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देणार आहे? जाणून घेऊयात.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo S16 आणि S16 Pro मध्ये, कंपनीकडून 6.78-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ ला सपोर्ट करतो. तसेच S16e मध्ये 120Hz च्या रीफ्रेश दरासह 6.62-इंचाचा HD + AMOLED डिस्प्ले उपलब्ध असणार आहे. जर स्टोरेजचा विचार केला तर हे स्मार्टफोन 12GB पर्यंत RAM आणि UFS 3.1 स्टोरेजसह येतात. प्रोसेसर म्हणून, कंपनी S16e मध्ये Exynos 1080, S16 मध्ये Snapdragon 870 तसेच S16 Pro मध्ये MediaTek Dimensity 8200 चिपसेट देत आहे.

जर फोटोग्राफीचा विचार केला तर कंपनीच्या S16 या फोनमध्ये 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. तसेच S16 Pro मध्ये Pro आणि S16e मध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असणार आहे. तर सेल्फीसाठी कंपनी S16 आणि S16 Pro मध्ये 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. त्याशिवाय S16e मध्ये 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध असणार आहे.

जर बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास कंपनी फोनच्या या V16 सीरीजमध्ये 4600mAh ची दमदार बॅटरी देत ​​आहे. ही बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. जोपर्यंत OS चा संबंध आहे, या सीरीजचे फोन Android 13 वर काम करतात. परंतु, या भारतात स्मार्टफोन्सच्या किंमत काय असणार याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe