Google Upcoming Smartphone : अखेर ठरलं ! तगड्या फीचर्ससह ‘या’ दिवशी लॉन्च होणार Pixel 7a, जाणून घ्या डिटेल्स..

Ahmednagarlive24 office
Published:

Google Upcoming Smartphone : जगभरात अनेकजण गुगलचे स्मार्टफोन वापरले जातात. अशातच गुगल सतत शानदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन लाँच करत असते. गुगलने काही दिवसांपूर्वी Pixel 6a हा स्मार्टफोन केला होता. या फोनने संपूर्ण मार्केट गाजवले आहे.

आता ही कंपनी आपला आगामी स्मार्टफोन म्हणजे Google Pixel 7a लाँच करण्याच्या तयारीत आहे. माहितीनुसार कंपनी लवकरच हा फोन मार्केटमध्ये आणेल. परंतु जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण या फोनची लाँच डेट समोर आली नाही.

कंपनीच्या आगामी Pixel 7a मध्ये 4,400mAh पॉवरफुल बॅटरी असू शकते, जी 20W वायर्ड चार्जिंग तसेच वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येऊ शकते. आगामी फोनच्या बॅटरीबद्दल असा दावा केला जात आहे की या फोनची एकदा पूर्ण चार्ज केली तर ती 72 तास टिकू शकते. Google Pixel 7a हा फोन सुद्धा ऑरेंज कलर ऑप्शनमध्ये ऑफर करण्यात येऊ शकतो.

जाणून घ्या खासियत

गुगल आपल्या आगामी फोनमध्ये OIS सह 64MP रियर कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देईल. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये 10.8MP सेंसर असेल. हा फोन शक्तिशाली वैशिष्ट्यांसह सुसज्ज असणार आहे. एका रिपोर्ट मध्ये असेही समोर आले आहे की हा फोन 256GB स्टोरेज ऑप्शन सह लाँच केला जाईल. परंतु अजूनही कंपनीकडून याबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात आली नाही.

Google Pixel 7a मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.1-इंचाचा FHD + OLED डिस्प्ले असेल. हा फोन Google च्या इन-हाऊस Tensor G2 चिपसेटसह नॉक करेल. तसेच यात UFS 3.1 सह 8GB LPDDR5 RAM आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज असेल. हा फोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टमसह येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe