शिवसेनेच्या आणि मातोश्रीच्या नादाला लागण्याआधी गोवऱ्या रचून यावं; संजय राऊतांचा नवनीत राणांवर घणाघात

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : हनुमान चालिसा पठणावरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले असून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ (Matoshri) बंगल्याबाहेर चालिसा पठण करणार असल्याचे सांगितले होते.

मात्र राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचनावरून माघार घेतली आहे. यावरून बोलताना शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले, खासदार बाई यांचा हिंदुत्वाचा संबंध काय? अयोध्या आंदोलन, श्रीरामचं नाव घ्यायला यांचा विरोध होता. शिवसेनेचं हिंदुत्व हे असा घंटाधारीचं नाही. आमचं हिंदूत्व गदाधारी आहे. आम्हाला कुणी हिंदूत्व शिकवू नये.

यांनी कृपया सेनेच्या वाट्याला जाऊ नये. मातोश्रीशी खेळू नका. वीस फूट खाली गाडले जालं. तुमच्या उकळीला दाबण्याची क्षमता शिवसेनेत आहे. मी नागपुरात आहे. उद्धवजींनी मला नागपुरात रहायला सांगितलं. ते म्हणाले, राष्ट्रपती राजवट कशी लागते हे आम्हाला माहीत आहे.

पहाटे शपथविधी घेऊन राष्ट्रपती राजवट उठवणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. कायदा कुणाला शिकवायच्या असेल तर राज्यपाल यांना शिकवा. या खासदार बाईंना केंद्राची सुरक्षा का मिळाली? हे खाजगीत सांगू. बोगस प्रमाणपत्र घेऊन ही बाई लोकसभा निवडणूक लढते.

सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. बोगस प्रमाणपत्रावर निवडूण आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. अशी खूप आव्हानं आम्ही स्वीकारली आणि परतून लावली. तुम्ही पळपुटे आहात, असाही घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच यापुढं शिवसेनेच्या आणि मातोश्रीच्या नादाला कुणी लागलं, त्यांनी गोवऱ्या रचून यावं. गोवऱ्या ही धमकी असले तर गेले दोन दिवस मुंबईत सुरु होतं तेही धमकीच होती, असा इशाराही संजय राऊत यांनी बोलताना दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe