7th Pay Commission : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. कारण आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार थकीत महागाई भत्ता, फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ आणि महागाई भत्त्यात वाढ करेल अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे. जर सरकारने हा निर्णय घेतला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात खूप मोठी वाढ होऊ शकते.
थकीत महागाई भत्ता मिळणार
सरकारने कोरोना काळात कर्मचाऱ्यांची 18 महिन्यांची डीए थकबाकी दिली नाही. यानंतर सरकारने थेट 1 जुलै 2021 रोजी डीएमध्ये 11 टक्क्यांची वाढ केली होती, परंतु सरकरने 18 महिन्यांसाठी डीए न वाढवण्याबद्दल किंवा थकबाकीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे आता सरकार अर्थसंकल्पात 18 महिन्यांचा डीए देईल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे.
फिटमेंट फॅक्टरमध्ये होणार वाढ
मागील अनेक दिवसांपासून कर्मचारी फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्क्यांवरून 3.68 टक्के करण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. जर त्यांची ही मागणी मान्य झाली तर कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये होईल.
महागाई भत्ता वाढवणार
वर्षातून दोनवेळा म्हणजे 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी महागाई भत्ता वाढवला जातो. यावेळी सरकार अर्थसंकल्पासोबतच डीएमध्येही वाढ करेल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे. सरकारने मागच्या वर्षी सप्टेंबरच्या अखेरीस महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवून 38 टक्के केला होता. आता सरकार 3 ते 4 टक्के डीए वाढवण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर डीए 41bते 42 टक्क्यांपर्यंत वाढून पगारात मोठी वाढ होईल.