Government Scheme : प्रत्येकजण कधी ना कधी लग्नाच्या बंधनात अडकला जातो. परंतु आजही आपल्या देशातआंतरजातीय विवाह करणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. केंद्र सरकारने आता या जोडप्यांना तब्बल 2.50 लाख रुपये देत आहे.
आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो परंतु त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत.या अटी आणि योजनेची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात.
जाणून घ्या योजनेबद्दल
या योजनेचे नाव डॉ. आंबेडकर फाऊंडेशन असे आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना योजनेंतर्गत 2.5 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते.
क्रमांक 1
जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही आंतरजातीय विवाह केलेला असावा.
क्रमांक 2
- तसेच आता नियमांनुसार, तुमचा विवाह हिंदू विवाह कायदा 1995 अंतर्गत नोंदणीकृत झाला असावा.
- महत्त्वाचे म्हणजे लग्नाची नोंदणी करण्यासाठी तुम्ही प्रतिज्ञापत्र प्रविष्ट करू शकता
क्रमांक 3
- ही योजना फक्त प्रथम लग्न करणाऱ्या जोडप्यांनाच लागू आहे.
- दुसरे किंवा त्यापेक्षा जास्त विवाह करणाऱ्यांना योजनेचा फायदा घेता नाही.
असा करा अर्ज
जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला लग्नानंतर एक वर्षाच्या आत डॉ. आंबेडकर फाऊंडेशनकडे अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.