Government of India : ‘त्या’ प्रकरणात सरकारने उचलले मोठे पाऊल ! अनेकांना मिळणार आर्थिक दिलासा ; वाचणार पैसा

Ahilyanagarlive24 office
Published:

Government of India : भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आता मोठा निणर्य घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पर्यटन परमिट सिस्टममध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत.

मंत्रालयाने ऑल इंडिया टुरिस्ट व्हेईकल अथॉरिटी आणि परमिट नियम-2021 च्या जागी नवीन नियम आणण्यासाठी मसुदा अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत निवेदनानुसार, 2021 मध्ये अधिसूचित केलेल्या नियमांमुळे पर्यटक वाहनांसाठी परमिट प्रणाली सुलभ करून देशातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळाली.

मसुदा जारी केला

निवेदनानुसार, “रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 11 नोव्हेंबर 2022 रोजी मसुदा अधिसूचना जारी केली. प्रस्तावित नियम ऑल इंडिया टुरिस्ट व्हेईकल अथॉरिटी आणि परमिट नियम-2021 ची जागा घेईल.”

आर्थिक दिलासा मिळण्याची आशा आहे

प्रस्तावित नियमांचे उद्दिष्ट प्रक्रिया सुलभ करणे आणि संपूर्ण भारतातील परमिट अर्जदारांसाठी अनुपालन ओझे कमी करणे आहे. कमी क्षमतेच्या वाहनांसाठी (दहापेक्षा कमी) कमी परमिट शुल्कासह पर्यटक वाहनांच्या अधिक श्रेणी प्रस्तावित केल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. या निर्णयामुळे कमी आसनक्षमतेसह लहान वाहने असलेल्या पर्यटक चालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे, कारण त्यांना आता त्यांच्या वाहनाच्या आसन क्षमतेनुसार शुल्क भरावे लागेल.

नियामक वातावरण

निवेदनानुसार, मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी ऑपरेटरना सुव्यवस्थित नियामक वातावरण प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. यावर संबंधित पक्षांना 30 दिवसांच्या आत अभिप्राय आणि सूचना देण्यास सांगण्यात आले आहे.

हे पण वाचा :- SBI Bank : एसबीआयच्या ग्राहकांना धक्का! बँकेने घेतला मोठा निर्णय ; आता द्यावा लागणार ‘इतका’ ईएमआय

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe