अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 Kisan Samman Nidhi Yojana :- देशातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायात (Agriculture Business) प्रगती साधता यावी शेती करताना त्यांना सोयीचे व्हावे यासाठी मायबाप शासन अनेक शेतकरी हिताच्या शासकीय योजना (Government Scheme) कार्यान्वित करीत असते.
या योजनेच्या साहाय्याने शेतकरी बांधवांना शेतीमध्ये मोठी मदत होत असते. शेतकरी बांधवांना (Farmers) शेती करण्यासाठी भांडवल आवश्यक असते.
परंतु वेळेवर शेतकऱ्यांना वेळेवर भांडवल उपलब्ध होत नाही. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. केंद्र सरकार (Central Government) आता शेतकऱ्यांना पीक कर्ज (Crop debt) उपलब्ध करून देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड देणार आहे.
या काळच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बँकेत न जाता देखील कर्ज उपलब्ध होणार आहे. एकंदरीत मायबाप शासनाच्या या किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) मुळे शेतकरी बांधवांमागची बँकेची कटकट कायमची संपणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी (Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi) यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेल्या किसान सम्मान निधि योजनेच्या (Kisan Samman Nidhi Yojana) पात्र लाभार्थ्यांना हे कार्ड सहज रित्या उपलब्ध होणार आहे.
या किसान कार्डची सर्वात मोठी विशेषता म्हणजे शेतकऱ्यांना या कार्डद्वारे दोनदा कर्ज दिले जाणार आहे. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वित्तीय संस्थांमध्ये म्हणजेच शेतकरी बांधव आपल्या जवळच्या बँकेत देखील या कार्ड साठी विचारणा करू शकता.
हे कार्ड प्राप्त करण्यासाठी शेतकरी बांधवांना आपला वैयक्तिक तपशील द्यावा लागणार आहे तसेच सातबारा उताऱ्याची माहितीदेखील द्यावी लागणार आहे.
या किसान कार्ड मध्ये शेतकरी बांधवांच्या शेतीची सर्व माहिती अद्ययावत केलेली राहणार आहे. सदर शेतकऱ्याने मागील वर्षी कोणते पीक घेतले, किती कर्ज घेतले, कर्जाची परतफेड वेळेवर झाली का? या सर्व गोष्टींची माहिती या कार्डमध्ये असणार आहे.
एवढेच नाही आगामी हंगामात सदर शेतकरी कोणते पीक घेणार आहे याची देखील माहिती त्या कार्डमध्ये अद्ययावत असणार आहे.
एकंदरीत शेतकऱ्यांची सर्व पिकाची नोंदणी या कार्डवर असेल. या कार्डवर असलेल्या माहितीच्या आधारे आणि मागील कर्ज वेळेवर फेडले तर शेतकरी बांधवांना या कार्डच्या माध्यमातून लगेचच कर्ज मिळणार आहे.
कर्जाची जेवढी मर्यादा असेल त्याचे दोन भाग करून शेतकरी बांधवांना एका आर्थिक वर्षात दोनदा कर्ज दिले जाणार आहे. मात्र, मागील कर्ज फेडल्याशिवाय शेतकऱ्यांना नव्याने कर्ज दिले जाणार नाही. यामुळे वेळेवर कर्जाची परतफेड केली तर निश्चितच या कार्डचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.