PM Kisan : देशभरातील करोडो शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. त्यामुळे शेतकरी आता 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
कारण सरकारने याबाबत माहिती दिली आहे. लवकरच शेतकऱ्यांना या योजनेच्या 13 व्या हप्त्याचे पैसे खात्यावर जमा होणार आहेत. परंतु, त्याआधी तुम्हाला EKYC करावे लागणार आहे. जर तुम्ही EKYC केले नाही तर या योजनेचे तुम्हाला पैसे मिळणार नाही.
या दिवशी खात्यात येणार पैसे
पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता 8 मार्च रोजी खात्यात येण्याची शक्यता आहे. परंतु, याबाबत अजूनही अधिकृत घोषणा झाली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार असे मानले जात आहे की होळीच्या दिवशी सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते.
अधिकृत ट्विटवर मिळाली माहिती
इतकेच नाही तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. अधिकृत वेबसाइटनुसार, आतापासून कोणत्याही शेतकऱ्याला भाषेच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. शेतकरी आता पीक विमा अॅप आणि एनसीआय पोर्टलवर शेतकरी हिंदी, इंग्रजीसह 12 प्रादेशिक भाषांमध्ये पीक विमा निगडित माहिती मिळवता येणार आहे.
जारी केले 12 हप्ते
पीएम किसान योजनेचे आत्तापर्यंत 12 हप्ते जारी केले आहेत. लवकरच आता सर्व शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. परंतु, जर तुम्ही अजूनही EKYC केले नसेल, तर ते लगेच करा, नाहीतर 13 व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाही.
अशाप्रकारे तपासा हप्त्याची स्थिती
- तुम्हाला हप्त्याची स्थिती पाहण्यासाठी पीएम किसानच्या वेबसाइटवर जावे लागणार आहे.
- त्यानंतर आता Farmers Corner वर क्लिक करावे लागणार आहे.
- आता Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
- आता तुमच्यासोबत एक नवीन पेज ओपन होईल.
- येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.