Oppo 5G Smartphone : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण ओप्पोचा 5G स्मार्टफोन तुम्ही आता स्वस्तात खरेदी करू शकता. Oppo च्या Reno7 5G स्मार्टफोनवर ही संधी मिळत आहे.
जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला फ्लिपकार्टवर जावे लागेल. दरम्यान काही दिवसांपूर्वी हा फोन मार्केटमध्ये लाँच झाला आहे. या फोनची किंमत 37,990 रुपये इतकी आहे. परंतु, सवलतींमुळे तो स्वस्तात मिळत आहे. तसेच यावर इतर ऑफरही उपलब्ध आहेत.
फीचर आणि स्पेसिफिकेशन
Oppo Reno7 5G या फोनमध्ये, कंपनी 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले देत असून तो 90Hz च्या रिफ्रेश दरासह येतो. त्याची ब्राइटनेस पातळी 800 nits आहे. तसेच डिस्प्लेच्या संरक्षणासाठी कंपनी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देत आहे. Oppo चा 5G फोन 8GB RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.
प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये MediaTek Dimensity 900 चिपसेट देण्यात आला दिला जात आहे. तर या फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत.
यामध्ये 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असलेला 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जात आहे.
फोनची बॅटरी 4500mAh ची असून ती 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 65W चार्जिंग फोनची बॅटरी फक्त 31 मिनिटांत 0 ते 100% पर्यंत चार्ज करू असा दावा कंपनीने केला आहे. अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/6, Bluetooth 5.2, GPS आणि USB Type C 2.0 सारखे पर्याय दिले आहेत.