Best Recharge Plan : जबरदस्त ऑफर! 90 दिवसांचा रिचार्ज प्लॅन केवळ 22 रुपयांमध्ये

Published on -

Best Recharge Plan : ग्राहकांची आवड आणि गरजेनुसार सर्व टेलिकॉम कंपन्या वेगवगळे प्लॅन्स ऑफर करत असते. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वात स्वस्त प्लॅन्स ऑफर करत आहे.

असाच बीएसएनएलचा एक जबरदस्त प्लॅन आहे. याची 90 दिवसांची वैधता असून नेक फायदे देतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्लॅनची किंमत 22 रुपये इतकी आहे.

22 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 22 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये स्थानिक आणि STD व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध असून त्यासाठी 30 पैसे प्रति मिनिट शुल्क ग्राहकांना मोजावे लागतील. वैधता 90 दिवसांची आहे. हे लक्षात ठेवा की हा प्लॅन फ्री व्हॉईस कॉलिंग आणि डेटा लाभांसह येत नाही.

25 रुपयांचा प्लॅन

जिओचा 25 रुपयांचा प्रीपेड प्लॅन वापरकर्त्यांना सध्याच्या सक्रिय प्लॅनप्रमाणेच वैधता देत आहे. कंपनी यामध्ये 2GB डेटा देते.

Airtel आणि Vi ही परवडणारे प्लॅन ऑफर करतात

Airtel आणि Vi ही आपल्या ग्राहकांना परवडणारे प्लॅन ऑफर करतात त्यांची किंमत रु. 22 पेक्षा कमी आहे. दोन्ही कंपन्याच्या प्लॅनची किंमत 19 रुपये आहे. एअरटेलच्या या प्लॅनची 1 दिवसाची वैधता असून यामध्ये 1GB डेटाचा लाभ मिळतो. 1GB डेटाचा लाभ Vi ने 19 रुपयांमध्ये दिला आहे, ज्याची वैधता 24 तास आहे. तसेच Vi अॅप्स, चित्रपट आणि टीव्ही शोचाही फायदा मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News