Republic Day Sale : सुरु झाली महाबचत सेल! स्मार्टफोन, टीव्ही यांसारख्या इतर वस्तूंवर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट

Ahmednagarlive24 office
Published:

Republic Day Sale : जर तुम्ही स्वस्तात iPhone सारख्या इतर ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तूमच्यासाठी एक चांगली संधी आहे. तुम्ही आता विजय सेल्स मेगा रिपब्लिक डे सेलमधून या वस्तू स्वस्तात मिळवू शकता.

त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. तसेच हेदेखील लक्षात घ्या की ही सेल काही दिवसांसाठी मर्यादित आहे. त्यामुळे लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्या.

या बँकांसोबतच्या व्यवहारांवर मिळणार जबरदस्त सवलत

हे लक्षात घ्या की या सेलमध्ये ICICI बँक कार्डधारकांना 25 जानेवारीपासून क्रेडिट तर डेबिट कार्ड EMI खरेदीवर 3,000 रुपयांपर्यंत 7.5% सूट मिळेल. या ऑफरसाठी कमाल व्यवहार मर्यादा 20,000 रुपये इतकी आहे.

नॉन-ईएमआय व्यवहारांसाठी विजय सेल्सने 20,000 रुपयांपेक्षा अधिकच्या खरेदीसाठी ICICI बँक क्रेडिट कार्डवर 1,500 रुपयांची सवलत जाहीर केली आहे. त्याशिवाय आता या सेलमध्ये येस बँकेच्या ग्राहकांना रु. 15,000 वरील ईएमआय खरेदीवर 2,000 रुपयांपर्यंत 5% सूट मिळेल. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड धारकांना 2,500 रुपयांपर्यंत 5% सूटदिली जात आहे.

मिळेल 53% पर्यंत सूट

या सेल दरम्यान तुम्ही Apple iPhone, Samsung Galaxy A23, Samsung Galaxy A53 5G आणि इतर वस्तूंवर सवलत मिळवू शकता. तसेच आता तुम्ही टॅब्लेट, ऍपल मॅकबुक लॅपटॉपवर ऑफरचा लाभ घेऊ शकता. या सेलमध्ये वॉशिंग मशीनवर तब्बल 53% पर्यंत सूट आहे. याशिवाय, तुम्ही हीटर, स्टीम इस्त्री, ओव्हन टोस्टर आणि इतर घरगुती वस्तूंवर भरघोस सूट मिळवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe