Realme Smartwatch : दिग्ग्ज टेक कंपनी Realme चे स्मार्टफोनप्रमाणे स्मार्टवॉचही खूप प्रसिद्ध आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन ऑफर घेऊन येत असते. अशीच एक ऑफर कंपनीने आणली आहे. आता कंपनीच्या अधिकृत स्टोअरमध्ये मोठ्या सवलतीत स्मार्टवॉच खरेदी करता येत आहे.
सवलतीनंतर तुम्ही हे स्मार्टवॉच 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत विकत घेऊ शकता. या स्मार्टवॉचमध्ये वापरकर्त्यांना 12 दिवसांचा बॅटरी बॅकअप आणि बरंच काही मिळेल. Realme TechLife Watch S100 या स्मार्टवॉचवर ही ऑफर मिळत आहे.
तुम्ही विचार करत असाल की Realme च्या या शानदार स्मार्टवॉचवर मोठ्या सवलती कुठे मिळत आहे. परंतु, Flipkart किंवा Amazon सारख्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर या सवलती उपलब्ध नसून त्याच्या अधिकृत स्टोअरवर उपलब्ध आहेत. जर तुम्हाला हे स्मार्टवॉच विकत घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला Realme India च्या वेबसाइटवरजावे लागेल. तसेच यावर 1,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक उपलब्ध आहे.
आजच करा खरेदी
भारतीय बाजारात Realme TechLife Watch ची किंमत 3,999 रुपये इतकी आहे. Amazon वर 45% डिस्काउंट मिळाल्यानंतर ते 2,188 रुपयांना लिस्ट केले गेले आहे. परंतु, रियलमीच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये फक्त 1,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. तुम्ही ते काळ्या आणि राखाडी दोन अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकाल.
अशी आहेत फीचर्स
हे स्मार्टवॉच स्क्वेअर डायल आणि मेटॅलिक फिनिशसह स्टाइलिश डिझाइनसह उपलब्ध आहे. यामध्ये 1.69-इंचाचा कलर डिस्प्ले आहे. हृदय गती व्यतिरिक्त, रक्त ऑक्सिजनचे निरीक्षण करण्याचा पर्याय SpO2 सेन्सरसह उपलब्ध आहे. 260mAh बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर, ती 12 दिवसांपर्यंत बॅटरीचे आयुष्य देते असा दावा कंपनीने केला आहे.
तसेच त्वचेचे तापमान मोजण्याचा पर्याय देणारे हे स्मार्टवॉच २४ स्पोर्ट्स मोडसह उपलब्ध आहे. यात 110 पेक्षा जास्त स्टयलिश वॉच फेस उपलब्ध आहेत. यात IP68 वॉटर रेझिस्टन्स रेटिंग आणि अलार्म, स्मार्टवॉच, फ्लॅशलाइट, फोटो किंवा म्युझिक कंट्रोलपासून फोन शोधण्यापर्यंतची स्मार्ट फीचर्स उपलब्ध आहेत.