अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 Rahuri Krishi Vidyapeeth :- एप्रिल महिना अर्ध्यावर आला असताना उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांसोबतच स्वत:ची, मजुरांची आणि जनवरांचीही काळजी घ्यावी, असा सल्ला राहुरी कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान केंद्राने दिला आहे.
या केंद्रातर्फे आज दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यात दि. १५ व १६ एप्रिल रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
पिकांची काळजी :शेतात पिकांसाठी मातीतील ओलावा वाचवण्यासाठी अच्छादनाचा वापर करावा, त्याकरीता गवताचा/ पिकाचे अवशेष/ पॉलिथीनचा उपयोग करावा.
मजुरांसाठी सल्ला :कामगारानी थेट सूर्यप्रकाशात कामाचे टाळावे. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल अॅपचा वापर करावा.
जनावरांसाठी सल्ला :जनावरांना सावलीत ठेवावे आणि पिण्यास भरपूर स्वच्छ आणि थंड पाणी द्यावे.
जनावरांकडून सकाळी १२ ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान काम करू घेवु नये.
हिरवे गवत, प्रथिनेयुक्त, खनिज मिश्रण आणि मीठयुक्त खाद्य द्यावे.
जनावरे सकाळी किवा सायंकाळी चरावयास न्यावे.
तापमान कमी करण्यासाठी शेडचे छत पेंढ्याने झाकावे तसेच भिंतींना पांढरे रंग द्यावा किंवा भिंतींना शेण-मातीचा लेप लावावा.