पालकमंत्री जिल्ह्यात फक्त झेंडा फडकावयाला येतात !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :-  पंधरा दिवसापूर्वी ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परंतु पालकमंत्र्यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला वेळ नाही. नुकसानग्रस्तांना भरपाई दिलेली नाही.

पालकमंत्री जिल्ह्यात फक्त झेंडा फडकला येतात व बैठका घेऊन निघून जातात, अशी टीका माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून समर्थ बूथ अभियान, किसान सन्मान योजना व लाभार्थी सन्मान दिवस साजरा करण्यात आला.

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे भाजपा व युनायटेड सिटी हॉस्पिटल अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कर्डिले यांच्या हस्ते व आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग, जि. प. सदस्य पुरुषोत्तम आठरे, मार्केट कमिटीचे संचालक बाबा पाटील खर्से, भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबन आव्हाड,

युवा नेते वैभव खलाटे, बंडू पाठक, श्रीकांत आटकर, पोपट गवळी, विजय गवळी, संजय नवल, डॉ. बबन नरसाळे, पोपट कराळे, जिजाबापू लोंढे, सचिन नेहुल, आण्णासाहेब शिंदे, एकनाथ झाडे, साहेबराव गवळी, विजय कुटे, बापु मिरपगार आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News