Gunaratna Sadavarte : भोंग्यांच्या प्रश्नावर शरद पवार यांच्या मध्यस्थीची गरज, सदावर्तेंची भोंग्याच्या आंदोलनात उडी?

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात हनुमान चालिसा, भोंग्यांच्या प्रकरणी राज्य सरकारवर (state government) हल्लाबोल केला जात आहे. नुकतेच मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत अल्टिमेटम दिला आहे.

यामध्ये राज ठाकरे यांनी राज्यात मशिदींवर भोंगे वाजविल्यास त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार असल्याचे म्हटले होते. त्यावरून मनसेच्या नेत्यांची धरपकडही राज्यात सुरू झाली.

या वादात आता वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी उडी घेतली असून राज्य सरकार भोंग्यांच्या आणि हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून मुस्कटदाबी करत आहे. यात राष्ट्रवादीचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बोलले पाहिजे, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

गुणरत्न सदावर्ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन (Bharti University Police Station) याठिकाणी बोलत होते. कोर्टाच्या आदेशानुसार येथे आल्याने त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास सांगितले. यावेळी त्यांना भोंग्यांच्या मुद्द्यावर विचारले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

यावेळी सदावर्ते म्हणाले, राज्यघटनेने सर्वांनाच धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. अशावेळी कोणी हनुमान चालिसा म्हणत असेल तर त्याचा काय गुन्हा, असा सवाल करत ही मुस्कटदाबी आहे, असा घणाघात त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.

तसेच यामुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याचेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. याप्रकरणी शरद पवार यांच्या मध्यस्थीची गरज त्यांनी बोलून दाखवली आहे.

दरम्यान, एसटी आंदोलन आणि त्यातील वादग्रस्त भूमिकेमुळे विविध पोलीस स्टेशनमध्ये सदावर्तेंवर गुन्हे दाखल आहेत. आता त्यांनी भोंग्यांच्या आंदोलनातही उडी घेतली असून सरकारला पुन्हा एकदा लक्ष केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe