India News :मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात एका वेगळाच भिकारी समोर आला आहे. डिजिटल युगाशी जुळवून घेत तेथील झुनझुन बाबा यांनी भीक मागण्यासाठी पेटीएम सारख्या डिजिटल माध्यमाचाही वापर केला.
आतापर्यंत त्यांनी कोट्यवधी रुपयांची माया या माध्यमातून जमविली आहे. आता त्यांना स्वत:चे हेलिकॉप्टर घाययचे आहे. त्यासाठी भीक मागणे सुरूच आहे.
मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात वास्तव्यास असलेले झुनझुन बाबा भीक मागण्याच्या या पद्धतीमुळे चर्चेत आहेत. पेटीएमवरून भीक मगतानाचा त्यांचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला. ते तेथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात भीक मागतात.
आपण हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी भीक मागत असल्याचे बाबा सांगतात. झुनझुनबाबांकडे ५० लाखांची रोकड आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या मालकीच्या जमिनी आहेत.
एखाद्याकडे सुट्टे नसल्यास बाबा त्याला पेटीएम करण्यास सांगतात. पेटीएमवरील मोबाईल नंबर त्यांच्या मुलाचा आहे. बाबांच्या नावे इंदूर आणि सागर जिल्ह्यात जमीन आहे.
खमकुआमध्ये एक मंदिर आणि जमीनदेखील त्यांच्या मालकीची आहे. भीक मागून त्यांनी ही सगळी कमाई केली आहे. भीक मागून मी पैसे गोळा केले आणि मालमत्ता खरेदी केली.
त्यात गैर काय, असा सवाल ते उपस्थित करतात. आता त्यांना हेलिकॉप्टर खरेदी करायचे आहे. तसे सांगूनच ते भीक मागत आहेत.