WiFi Tips : तुमच्याही इंटरनेटचा स्पीड कमी झालाय? तर मग करा ‘हे’ काम

Published on -

WiFi Tips : सध्या प्रत्येकाकडेच स्मार्टफोन आहे. तसेच वाय-फाय कनेक्शन देखील प्रत्येकाकडेच असते. परंतु, अनेकांना कमी इंटरनेट स्पीडचा सामना करावा लागतो. काहीवेळेस महत्वाचे काम सुरु असताना इंटरनेटचा वेग कमी होतो.

त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जर तुमच्याबाबतही असे घडत असेल तर काळजी करू नका. तुम्ही सोप्या पद्धतीने इंटरनेट स्पीड वाढवू शकता. इंटरनेटचा वेग वाढवण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा.

फॉलो करा या टिप्स

क्रमांक १

तुमच्या वाय-फायचा पासवर्ड मजबूत ठेवा. त्यामुळे कोणीही तुमच्या परवानगीशिवाय Wi-Fi शी कनेक्ट होऊ शकणार नाही.

क्रमांक २

जेव्हाही तुम्ही तुमच्या घरी वाय-फाय सेट कराल तेव्हा तुमच्या घराच्या राउटरला ज्या अंतरावरून वाय-फाय वायर येते ती ९० मीटरपेक्षा जास्त नाही ना ते तपासा. वाय-फायचा वेग कमी होण्याचे हे एक मोठे कारण आहे.

क्रमांक ३

राउटरवर दोन किंवा अधिक अँटेनाचे काम सिग्नल पाठवणे आहे. जर हेअँटेना वाकले किंवा बंद असले तरी इंटरनेटचा वेग कमी होऊ शकतो. त्यामुळे त्यांना सतत सरळ ठेवा.

क्रमांक ४

तुम्ही तुमच्या घरात राउटर कुठेही ठेवता, शक्यतो अनेकजण राउटर जमिनीवर ठेवतात. त्यामुळे इंटरनेटचा वेग कमी होतो. म्हणूनच तो नेहमी वरच्या बाजूला म्हणजेच भिंतीवर ठेवा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe