अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- अखेर चार साडेचार तासांच्या नाट्यानंतर मुंबई पोलीसांशी हुज्जत घालत भाजप नेते किरिट सोमैय्या यानी घरच्या गणेशाचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर करत महालक्ष्मी एक्सप्रेसने नियोजीत दौ-याची सुरूवात केली आहे.
मात्र, ठाणे रेल्वे स्थानकात त्यांना उतरवले जाण्याची शक्यता होती. महालक्ष्मी एक्सप्रेस ठाणे स्थानकात येताच पोलिस ट्रेमनध्ये चढले आणि सोमय्या यांच्याशी चर्चा करत त्यांना ट्रेनधून उतरण्याची विनंती केली. मात्र, सोमय्या ट्रेनमधून उतरले नाहीत.

कोल्हापूरला जाण्यासाठी निघालेले भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचले तेंव्हाही पोलिसांनी त्यांना अडवले. मात्र, कोणीही मला येथे अडवू शकत नाही. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मला कोल्हापुरात येण्यास बंदी घातली आहे, मात्र मुंबईतून इतर ठिकाणी जाण्याचे आदेश त्यांनी दिलेले नाहीत.
पोलिसांनी मी कोल्हापूरला गेल्यास तेथे अटक करावी, मात्र मला मुंबईत अडवू शकत नाहीत असे म्हणत किरीट सोमय्या यांनी महालक्ष्मी एकस्प्रेसने प्रवास सुरू केला. त्यामुळे कोकणात नारायण राणेंचे अटकनाट्य रंगले तसे सोमैय्या यांचेही उद्या राजकीय नाट्य घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आपल्या जीवाला धोका असल्याने आपण कोल्हापूरला जाऊ नका, असे पोलिसांनी किरीट सोमय्या यांना सांगितले. मात्र किरीट सोमय्या यानी काही न ऐकता नियोजीत दौरा सुरू केला. सोमय्या म्हणाले की, पोलिस मला सांगत आहेत की माझ्या जीवाला धोका आहे.
त्यामुळे तुम्ही कोल्हापूरला जाऊ नका. सोमैय्या म्हणाले की, मला देण्यात आलेली नोटीस पूर्णपणे बेकायदा आहे. मी कोल्हापुरात जाताच प्रथम अंबामातेचे दर्शन घेणार आहे. काहीही झाले तरी उद्या मी मंत्री हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढणारच असा निर्धार सोमय्या यानी व्यक्त केला आहे.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे हे कारस्थान आहे. पोलिस माझ्यावर दादागिरी करत आहेत असेही सोमय्या. म्हणाले. त्यानंतर ते महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये आपल्या सीटवर जाऊन बसले
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम