PAN Card Loan Fraud : तुमच्या पॅन कार्डचा वापर करून इतरांनी कर्ज तर घेतलं नाही ना? असे करा चेक

Published on -

PAN Card Loan Fraud : पॅन कार्ड हे सरकारी महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असून ते आता आर्थिक व्यवहारांसाठी कामी येते. परंतु, त्याचा इतर कोणी वापर चुकीच्या कामासाठी करत असेल तर? असे प्रकार दिवसेंदिवस घडत आहेत. त्यामुळे अनेकांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे.

सायबर गुन्हेगार आता नागरिकांची खासगी माहिती चोरी करून फसवणूक करत आहे. अशाप्रकारामध्ये सायबर गुन्हेगार इतरांच्या पॅन कार्डच्या मदतीने कर्ज घेत आहेत. परंतु, तुम्हाला आता तुमच्या नवे कोणी कर्ज घेतले आहे का ते सहज समजू शकेल.

सध्या अनेक स्मार्टफोन अॅप्स काही मिनिटांत वैयक्तिक कर्ज देण्याचा दावा करतात. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे पॅन कार्ड आणि मोबाइल नंबरद्वारे लहान वैयक्तिक कर्ज घेतात. तर त्याचवेळी त्या संबंधित व्यक्तीला त्याची कसलीच माहितीही नसते.

एखाद्या व्यक्तीचे पॅनकार्ड त्याच्या बँक खात्याशी जोडलेले असते. त्यामुळे तुम्ही बँकेत जाऊन तुमचा सिबिल स्कोअर तपासू शकता. यावरून तुम्हाला समजेल की तुमच्या नावावर किती कर्ज आहे?

जर तुमच्याकडे कर्ज असेल ज्याची परतफेड केली जात नसेल तर तुमचा CIBIL स्कोर कमी होईल. तसेच तुमच्या क्रेडिट रिपोर्टद्वारे तुमच्याकडे किती कर्जाची थकबाकी आहे हे तुम्हाला सहज समजू शकेल.

जर तुमच्या क्रेडिट अहवालात तुम्हाला काही विसंगती आढळली तर तुम्हाला याबद्दल क्रेडिट ब्युरो आणि क्रेडिट प्रदात्याशी संपर्क साधावा लागू शकतो. त्यांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News