HDFC Bank: एचडीएफसी बँक ग्राहकांनो लक्ष द्या ! बँकेने केला ‘हा’ मोठा बदल ; 1 जानेवारीपासून होणार लागू जाणून घ्या नाहीतर ..

Ahmednagarlive24 office
Published:

HDFC Bank:  तुम्ही देखील HDFC Bank ग्राहक असला तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता HDFC Bank मध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून मोठा बदल होणार आहे.

या बदलाची माहिती  बँक आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवनु देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो HDFC Bank ने क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये हा बदल करण्याची तयारी केली आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो बँकेने क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉइंट्स आणि फी स्ट्रक्चर बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. चला तर जाणून घ्या या नवीन बदलाबद्दल संपूर्ण माहिती.

रिवॉर्ड पॉइंट्समधील बदल आणि फायदे

भाड्याच्या पेमेंटवर कोणतेही रिवॉर्ड पॉइंट नसतील.

रिवॉर्ड पॉइंट काही ठराविक कार्डांवरच सरकारी व्यवहारांवर मिळतील.

शिक्षणाशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्सवर मर्यादा घालण्यात आली आहे.

तनिष्क व्हाउचरच्या रिवॉर्ड पॉइंट्सवर 50,000 पर्यंतची मर्यादा देखील लागू करण्यात आली आहे.

भाड्यावर 1% अतिरिक्त शुल्क

बँकेने सांगितले की थर्ड पार्टी मर्चंटच्या माध्यमातून भाड्याचे पेमेंट देखील बदलले जाईल. 1  जानेवारीपासून अशा पेमेंटवर 1 टक्के शुल्क आकारले जाईल, असे बँकेने म्हटले आहे. हे शुल्क दुसऱ्या महिन्याच्या भाडे व्यवहारावर ग्राहकांकडून घेतले जाईल.

अधिकृत वेबसाइटवर माहिती

एचडीएफसी बँकेने आपल्या अधिकृत वेबसाइटवर या बदलांबद्दल सांगितले आहे. बँकेने याबाबत 6 मुद्यांमध्ये तपशील दिला आहे. बँकेने अनेक प्रकारच्या पेमेंट व्यवहारांवर शुल्क आकारण्याची तयारी केली आहे. यासोबतच फी भरण्याच्या रचनेतही बदल करण्यात आला आहे.

बँकेने म्हटले आहे की किराणा व्यवहारावरील रिवॉर्ड पॉइंट्स आता प्रत्येक महिन्यासाठी मर्यादित असतील. वेगवेगळ्या कार्ड्सची रिवॉर्ड सिस्टमही वेगळी असेल. या रिवॉर्ड पॉइंट्सच्या मदतीने तुम्ही भाडे भरणे, फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगचा लाभ घेऊ शकाल.

हे पण वाचा :- FD Benefits: गुंतवणूकदार होणार मालामाल ! ‘या’ FD मध्ये गुंतवा पैसे ; मिळणार सर्वाधिक व्याज

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe