मंडल अधिकाऱ्यास शिवीगाळ करत गौणखनिजांचा डंपर पळविला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  जिल्ह्या गुन्हेगारी वाढली आहे त्याचबरोबर अवैध धंदे करणारे तस्कर यांची मुजोरी देखील वाढली आहे.

कायद्याचा धाक या तस्करांना उरलेला नसल्याने अधिकाऱ्यांना न जुमानता सर्रास आपला व्यवसाय हे तस्कर दिवसाढवळ्या करत आहे.

दरम्यान असाच काहीसा प्रकार जिल्ह्यात नुकताच घडला आहे. नगर तालुक्यातील वारूळवाडी येथील मिरवलीबाबा पहाडाजवळ मंडल अधिकाऱ्यास दमदाटी व शिवीगाळ करत गौणखनिजांचा डंपर पळवून नेल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

नगर तालुक्यातील वारूळवाडी येथील मिरवलीबाबा पहाडाजवळ दोघे आरोपीअवैधरीत्या डंपरमधून गौण खनिजांची वाहतूक करताना वाघमारे यांना आढळून आले.

यावेळी वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डंपर तहसील कार्यालयात आणला होता. मात्र दोन आरोपींनी शिवीगाळ करत डंपर पळवून नेला.

याबाबत वाळकी येथील मंडल अधिकारी भागीनाथ जगन्नाथ वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोपाल जाधव व विशाल वारुळे रा. वारूळवाडी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe