Ahmednagar News:सध्या एकीकडे दिवाळीची लगबग सुरू आहे तर दुसरीकडे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार असल्याने ऊसतोड मजुरांची आवराआवर चालू आहे.
दरम्यान कारखान्यावर जाण्यास उशीर झाला म्हणून मुकादमाने केलेल्या मारहाणीत एका मजुराचा मृत्यू झाला आहे. संजय माळी (रा. खडांबे ता. राहुरी) असे त्या दुर्दैवी ऊसतोड मजुराचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, राहुरी तालुक्यातील खडांबे येथील संजय काशिनाथ माळी व सोमनाथ पांडुरंग दळवी या ऊसतोडणी कामगारास मुकादम अशोक जाधव (रा. हारेवाडी ता. आष्टी,जि. बिड) व भावनाथ पांढरपैसे (रा. मोहोजदेवढे,ता. पाथर्डी) या दोघांनी उचल दिली होती.
परंतु काही कारणामुळे माळी व दळवी यांना ऊस तोडणीसाठी कारखान्यावर जाण्यास उशिर झाला. याचा राग मनात ठेवुन मुकादम अशोक जाधव व भावनाथ पांढरपैसे या दोघांनी त्यांच्या खडांबे गावी जात त्या दोघांना आणुन जाधव यांच्या हारेवाडी गावातील खोलीत साखळदंडाने बांधून काठ्यांनी जबर मारहाण केली.
त्यातच संजय माळी याचा मृत्यु झाला. मयत संजय माळी यास आपण यास दवाखान्यात घेवुन जावु असे खोटे सांगुन त्याचा मृतदेह मोटारसायकलवरून करंजी घाटात टाकून दिला.
पाथर्डी पोलिसांनी सोमनाथ दळवी याच्या दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करुन अशोक जाधव यास चोवीस तासात अटक केली मात्र त्याचा दुसरा मुकादम साथीदार फरार झाला.
करंजी घाटाच्यावर अंभोरा (ता.आष्टी) पोलिस स्टेशनची हद्द सुरु होते खुनाचा गुन्हा अंभोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडुनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.