‘त्याने’ मोबाईल चोरला; पोलिसांनी बेड्या ठोकल्या

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  घरातून मोबाईलची चोरी करणारा आरोपी जुनेद सादिक शेख (वय 32 रा. बाराइमाम कोठला, झोपडपट्टी, नगर) याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.

त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. रोहीत अरूण उमाप (वय 18 रा. बाराइमाम कोठला, नगर) यांच्या घरात रविवारी रात्री चोरट्याने प्रवेश करून चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरून नेला होता.

याप्रकरणी उमाप यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक शेख करीत असताना आरोपी जुनेद शेख याने ही चोरी केल्याचे समोर आले.

पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सलिम शेख, सुनील शिरसाठ, शफी शेख यांनी आरोपी जुनेद शेख याला अटक केली. त्याने चोरीचा मोबाईल काढून दिला आहे.